तुमच्या नवीन वेबसाइटचा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक आहेत – डोमेन नाव आणि होस्टिंग. होस्टिंगसाठी होस्टिंगर (Hostinger) हा सर्वोत्तम पर्याय आहे, त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि परवडणाऱ्या किंमतींमुळे.
परंतु, डोमेन नोंदणीसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. भारतात वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख डोमेन रजिस्ट्रारबद्दल मी येथे माहिती देत आहो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आवश्यकतांनुसार योग्य निवड करू शकाल.
1. नेमचीप (Namecheap)
नेमचीप हा एक लोकप्रिय आणि उत्तम डोमेन नोंदणी वेबसाइट आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला मोफत व्होइस (WHOIS Privacy Protection) गोपनीयता मिळते. पेमेंट पर्यायांमध्ये आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड आणि पेपाल (PayPal) यांचा समावेश आहे, परंतु UPI उपलब्ध नाही.

किंमत:
- .com – $6.49 (सुमारे ₹550)
- .org – $7.48 (सुमारे ₹640)
- .in – $6.48 (सुमारे ₹550)
2. बिगरॉक (Bigrock)
बिगरॉक हा भारतीय ग्राहकांसाठी सर्वात चांगला पर्याय आहे. पण लक्षात ठेवा, इथे WHOIS Privacy वेगळं विकत घ्यावं लागतं, मोफत नाही. या वेबसाइटवर तुम्हाला UPI, भारतीय डेबिट कार्ड आणि आंतरराष्ट्रीय कार्ड असे पेमेंट पर्याय मिळतात, जे भारतीय वापरकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर आहे.

किंमत:
- .com – ₹919
- .org – ₹999
- .in – ₹399
3. डायनाडॉट (Dynadot)
डायनाडॉट हा आणखी एक लोकप्रिय डोमेन रजिस्ट्रार आहे. यात WHOIS Privacy मोफत समाविष्ट आहे. पेमेंट पर्यायांमध्ये फक्त आंतरराष्ट्रीय डेबिट कार्ड आणि पेपाल यांचा समावेश आहे, भारतीय पेमेंट पद्धती उपलब्ध नाहीत.

किंमत:
- .com – $10.86 (सुमारे ₹930)
- .org – $6.99 (सुमारे ₹595)
- .in – $5.63 (सुमारे ₹480)
4. होस्टिंगर (Hostinger)
होस्टिंगर भारतात खूप लोकप्रिय आहे. मोफत व्होइस गोपनीयता (WHOIS Privacy) समाविष्ट आहे आणि पेमेंट पर्यायांमध्ये सर्व प्रकारची कार्ड, UPI आणि रुपे कार्ड यांचा समावेश आहे, जे भारतीय वापरकर्त्यांसाठी अतिशय सोयीस्कर आहे.

किंमत:
- .com – ₹759
- .org – ₹699
- .in – ₹429
5. स्पेसशिप (Spaceship)
स्पेसशिप हा एक नवीन डोमेन रजिस्ट्रार आहे जो लोकप्रिय होत आहे. यात मोफत WHOIS Privacy समाविष्ट आहे. पेमेंट पर्यायांमध्ये फक्त आंतरराष्ट्रीय पेमेंट पद्धतींचा समावेश आहे, भारतीय पेमेंट पद्धती उपलब्ध नाहीत.

किंमत:
- .com – $8.88 (सुमारे ₹760)
- .org – $5.62 (सुमारे ₹480)
- .in – $5.18 (सुमारे ₹440)
शेवटी
जर तुम्ही भारतातून सहज पैसे भरणं आणि स्वस्तात डोमेन घ्यायचं बघत असाल तर Bigrock किंवा Hostinger बघू शकता. आंतरराष्ट्रीय पेमेंट चालत असेल तर Namecheap किंवा Dynadot पण चांगले पर्याय आहेत. मोफत व्होइस गोपनीयता (WHOIS Privacy) आणि किंमत लक्षात घेऊन तुमच्या प्रवासाला सुरुवात करा!